निलंबन रद्द झाल्यानंतर केली चर्चा
पक्षवाढीसाठी काम करण्याच्या सूचना…
कणकवली : भाजपचे जिल्हा चिटणीस एकनाथ नाडकर्णी यांनी आज दोडामार्ग येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह पालकमंत्री नितेश राणे यांची कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेत चर्चा केली. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी नाडकर्णी यांना शुभेच्छा देत पक्षकार्यासाठी पुन्हा सक्रिय होण्याचे आवाहन केले. श्री. नाडकर्णी यांच्यावरील निलंबन नुकतेच मागे घेण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली. गेल्या वर्षी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षशिस्त भंगाचा ठपका ठेवत एकनाथ नाडकर्णी यांचे भारतीय जनता पार्टीतून निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर अलीकडेच श्री. नाडकर्णी यांनी पक्षाकडे निलंबन रद्द करण्याची विनंती केली होती. त्यानंतर सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी त्यांचे निलंबन रद्द केले होते. नाडकर्णी हे पक्षातील एक ज्येष्ठ पदाधिकारी असून त्यांनी यापूर्वी पक्षासाठी दिलेल्या योगदानाचा विचार करून हे निलंबन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच त्यांना पक्षकार्यात पुन्हा सक्रिय होण्याचे आवाहनही करण्यात आले होते. या भेटीवेळी एकनाथ नाडकर्णी यांच्यासह भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस, माजी अध्यक्ष सुधीर दळवी, आनंद तळणकर, वैभव इनामदार, संजय सातार्डेकर, प्रकाश गवस, संजय विरनोडकर, कळणे सरपंच श्री. देसाई, तळकट सरपंच सुरेंद्र सावंत, तुकाराम बर्डे आदींसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.