15 C
New York
Thursday, October 30, 2025

Buy now

दारिस्तेतील विद्यार्थ्यांना युवासेनेकडून छत्र्यांचे वाटप

कणकवली : शिवसेना उबाठा पक्षाच्या युवासेनेचे कणकवली युवासेना तालुकाप्रमुख उत्तम सुरेश लोके यांनी दारिस्ते येथील जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत छत्र्यांचे वाटप केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुधाकर जाधव, युवासेना शाखाप्रमुख विजय गावकर, युवासेना उपशाखाप्रमुख श्रीराम गुरव, लवू पवार, सुरेश लोके, अंगुली जाधव, संदीप गांवकर, मदन बागवे, दिलीप लोके, ओमकार गावकर यांच्यासह शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. उत्तम लोके हे दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करतात. यंदाही त्यांनी १८ दारिस्ते गावातील जिल्हा परिषद शाळांतील विद्याथ्यांना छत्र्या वाटप केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!