24.3 C
New York
Sunday, July 20, 2025

Buy now

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या

पश्चिम रेल्वेकडून ५ तर मध्य रेल्वेकडून ११ गणपती विशेष गाड्यांची घोषणा

भाविकांच्या सोयीसाठी मध्य तसेच पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून गुजरातसह मुंबई, पुणे येथून फेऱ्या जाहीर

कणकवली : कोकणात गणेशोत्सासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मध्य तसेच पश्चिम रेल्वेच्या मार्गांवरून गुजरातसह मुंबई, पुणे येथून कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्यांच्या फेऱ्या जाहीर करण्यात आल्या आहेत. १७ जुलै रोजी जाहीर केलेल्या विशेष गाड्यांमध्ये पश्चिम रेल्वेकडून ५, तर मध्य रेल्वेकडून ११ गणपती विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे.

कोकणातील गणेशोत्सवासाठी हजारो भाविक दरवर्षी आपल्या गावी जातात. त्यांच्या प्रवासाच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने ५ फेऱ्या जाहीर केल्या पाठोपाठ मध्य रेल्वेनेही ११ विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. या गाड्या कोकण रेल्वे मार्गे धावणार असून, मुंबई, पुणे तसेच लो. टिळक टर्मिनस मुंबई येथून रत्नागिरी, सावंतवाडी, मडगाव व चिपळूण या स्थानकांपर्यंत या विशेष फेऱ्या धावणार आहेत.

मध्य रेल्वेच्या घोषित विशेष गाड्यांमध्ये १) ०११५१/५२ – मुंबई सीएसएमटी – सावंतवाडी -मुंबई (रोज), २). ०११५३/५४ – मुंबई सीएसएमटी – रत्नागिरी – मुंबई (रोज), ३) ०११६७/६८ – लोकमान्य टिळक टर्मिनस -सावंतवाडी – मुंबई (दैनिक), ४) ०११७१/७२ -लोकमान्य टिळक टर्मिनस सावंतवाडी मुंबई (दैनिक), ५) ०११८५/८६ – लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव – मुंबई (साप्ताहिक), ६) ०११६५/६६ – लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव – मुंबई (साप्ताहिक), ७) ०१४४७/४८ पुणे- रत्नागिरी पुणे (साप्ताहिक), ८) ०१४४५/४६ – पुणे रत्नागिरी पुणे (साप्ताहिक), ९) ०११०३/०४ मुंबई सीएसएमटी सावंतवाडी मुंबई (दैनिक), १०) ०११२९/३० –लोकमान्य टिळक टर्मिनस सावंतवाडी मुंबई (साप्ताहिक), ११) ०११५५/५६ – दिवा चिपळूण – दिवा (रोज) या गाड्यांचा समावेश आहे. या सर्व गाड्या गणेशोत्सव काळात भाविकांच्या अतिरिक्त गर्दीची आवश्यकता लक्षात घेऊन सुरू करण्यात आल्या आहेत. यात रोज धावणाऱ्या व साप्ताहिक गाड्यांचा समावेश आहे. पश्चिम रेल्वेनेही कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी २२ विशेष रेल्वे फेऱ्या जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये ९०११/१२ मुंबई सेंट्रल ते ठोकूर (साप्ताहिक), ०९०१९/२० मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी (आठवड्यातील चार दिवस ४ दिवस), ०९०१५/१६ वांद्रे ते रत्नागिरी साप्ताहिक विशेष गाडी, ०९११४/१३ बडोदा ते रत्नागिरी (साप्ताहिक), ०९११०/०९ विश्वामित्रा ते रत्नागिरी (साप्ताहिक) या पाच विशेष गाड्यांचा समावेश आहे. या विशेष गाड्यांचे आरक्षण लवकरच खुले होणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!