दोन दिवसांपूर्वी जामिनावर झाली होती मुक्तता
महाराष्ट्राच्या बाहेर होणार हद्दपारी ; पोलिसांची माहिती
कुडाळ : सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर खून प्रकरणी जामीनावर मुक्तता झालेल्या मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाट याची हद्दपारी निश्चित झाली आहे. त्याला कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून महाराष्ट्र राज्याच्या सीमेबाहेर त्याची हद्दपारी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर हा सिद्धेश शिरसाट यांच्याकडे कामाला होता दरम्यान त्याचा घातपात झाल्याबाबत त्याच्या नातेवाईकांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास केला आणि याप्रकरणी मुख्य आरोपी म्हणून सिद्धेश शिरसाट यांच्यासह त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती त्याच कालावधीमध्ये सिद्धेश शिरसाट याचा हद्दपारचा प्रलंबित असलेला प्रस्ताव मंजूर झाला. मात्र सिद्धेश शिरसाट हा न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे ही कारवाई झाली नव्हती. दरम्यान सिद्धेश शिरसाट याची जामीनावर मुक्तता झाल्यानंतर पोलिसांनी सिद्धेश शिरसाट याला ताब्यात घेतले. त्याच्या हद्दपारबाबत कारवाई सुरू केली महाराष्ट्र राज्याच्या सीमेबाहेर त्याची हद्दपारी केली जाणार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.