2.3 C
New York
Friday, January 23, 2026

Buy now

पालकमंत्री ना. नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली : मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे.

रविवारी सकाळी ०७.३० वा. अधिश निवासस्थान, जुहू, मुंबई येथून मुंबई विमानतळाकडे प्रयाण, सकाळी ०७.४५ वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आगमन व राखीव, सकाळी ०८.१५ वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने गोव्याकडे प्रयाण, सकाळी ०९.३० वा. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण, सकाळी १०.३० वा. कुडाळा तालुका भंडारी समाज मेळावा व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यास उपस्थिती, दुपारी १२.०० ते ०४.०० पर्यंत, ओम गणेश निवासस्थान येथे गाठीभेटी, सायं ०५.३० वा. कोकणसाद या दैनिकाचा ३६ वा. वर्धापन दिन व विशेषांक प्रकाशन सोहळयास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती असे त्यांच्या संपर्क कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!