मालवण : येथील नगर वाचन मंदिर तर्फे सौ. विंदा जोशी स्मृती वक्तृत्व स्पर्धा १० ऑगस्टला आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा मालवण तालुकास्तरीय असून ती सकाळी १० वाजता होणार आहे. यात तालुक्यातील सर्व शाळांचे इयत्ता ५ ते ७ वी मधील विद्यार्थी/विद्यार्थिनी सहभागी होऊ शकतात. यासाठी काय आवडत ?… मोबाईल गेम की पुस्तक वाचन, मराठी माझी मायबोली, चाणक्यनिती आणि मी असे विषय आहेत. दुसरा गट जिल्हास्तरीय असून ही स्पर्धा दुपारी ३.३० वाजता होणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांचे इयत्ता ८ ते १० वी मधील विद्याथी – विद्यार्थिनी सहभागी होऊ शकतात. यासाठी पहलगाम- भारताच्या स्वाभिमानावरील दहशतवादी हल्ला, सिंधुदुर्ग किल्ला- जागतिक वारसास्थळ, हिंदी विषयाची सक्ती योग्य की अयोग्य? हे विषय आहेत. तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये माग घेण्यासाठी ४ ऑगस्ट पर्यंत नावनोंदणी स्पर्धकांच्या भ्रमणध्वनीसहित ग्रंथालयाच्या कार्यालयीन वेळेत करावी. स्पर्धेचा निकाल स्पर्धा समाप्तीनंतर लगेच देण्यात येईल. यशस्वी स्पर्धकांना आकर्षक पारितोषिके व प्रशस्तीपत्रके देण्यात येतील. अधिक माहितीसाठी संस्थेचे ग्रंथपाल ९४२२२३४९५० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष उदयराव मोरे व कार्यवाह प्रा. नागेश कदम यांनी केले आहे.