कणकवली : परमहंस भालचंद्र महाराज संस्थान कणकवलीच्या शैक्षणिक मंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे पूर्व उच्च माध्यमिक पाचवी व पूर्व माध्यमिक आठवी या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. या मार्गदर्शन शुभारंभ रविवार २० जुलै रोजी आशीर्वाद फक्त निवास सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
या शैक्षणिक मंडळामार्फत गेली ४० वर्षे सतत मार्गदर्शन वर्ग व सराव परीक्षा आणि राज्यस्तरीय मार्गदर्शकांचा मार्गदर्शन वर्ग यांचे आयोजन करत आले आहेत. हे मार्गदर्शन वर्ग शुभारंभानंतर लगेचच ५ वी व ८ वीच्या प्रवेशार्थी विद्यार्थ्यांसाठी गणित विषयाचे मार्गदर्शन होईल व पालकांसाठीही मार्गदर्शन वर्ग होणार आहे. हे मार्गदर्शन व रविवारी सकाळी नऊ ते बारा या वेळेत जि प शाळा कणकवली नंबर 3 या प्रशालेत घेण्यात येणार आहेत. गावाला शैक्षणिक मंडळाच्या तज्ञ मार्गदर्शन दलित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी या विषयांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या मार्गदर्शन वर्गासाठी प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी आगावू प्रवेश नोंद करून प्रवेश निश्चित करावा. शुभारंभादिनी त्यांचे प्रवेश अर्ज व प्रवेश शुल्क भरून घेतले जाईल. येताना सोबत विद्यार्थ्यांचा फोटो आणावा. अधिक माहितीसाठी शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष गजानन उपरकर व संस्थान व्यवस्थापक विजय केळूसकर (९५६१३४७५२५) आणि शैक्षणिक मंडळ सदस्य शरद हिंदळेकर, प्रकाश परब, काशिनाथ कसालकर, श्रीकृष्ण कांबळी, व्ही.टी. सुतार, सुहास आरोलकर, मंगेश तेली, रावजी परब, सदानंद गावकर, किरण कोरगावकर यांच्याशी संपर्क साधावा. शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन वर्गाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत, खजिनदार दादा नार्वेकर, सचिव निवृत्ती धडाम, सर्व सदस्य यांनी केले आहे.