कणकवली : लायन्स क्लब ऑफ कणकवलीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा येथील मातोश्री मंगल कार्यालयात डिस्ट्रिक माजी प्रांतपाल जगदिश पुरोहित यांच्या उपस्थितीत झाला.
नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. प्रवीण बिरमोळे, सचिव प्रा. दिवाकर मुरकर व त्यांच्या कार्यकारिणी मंडळाला शपथ देण्यात आली. यावेळी चार्टर प्रेसिझेंट डॉ. बाळकृष्ण म्हाडेश्वर आदी मान्यवर उपस्थित होते.
नूतन मंडळातील पदाधिकारी उपाध्यक्ष महेश काणेकर, विजय पवार, खजिनदार डॉ. प्रवीण गोरुले, पीआरओ अजय वर्दम, ज्योती कदम, मंगेश आरेकर, एल. सी. आय. एफ चेअरमन विलास बुचडे, जीएलटी चेअरमन प्रा. नारायण राणे, जीएलटी चेअरमन प्रा. मोहन कुंभार, मार्केटिंग चेअरमन प्रसाद राणे, क्वीस्ट चेअरमन डॉ. शमिता बिरमोळे यांना पदाची शपथ देण्यात आली.
जगदिश पुरोहित म्हणाले, लायन्स क्लब ही आंतरराष्ट्रीय सेवाभावी संघटना आहे. यामध्ये काम करण्याची सर्वांना संधी मिळते. संघटेनेत मला काम करायला मिळते, हे माझे भाग्य समजतो. भविष्यात क्लबच्या माध्यमातून सेवाभावि कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ.प्रवीण बिरमोळे यांनी क्लबच्या माध्यमातून विविध योजना राबविणार असल्याचे सांगितले.