25.3 C
New York
Thursday, July 17, 2025

Buy now

वागदे नंबर १ शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

कणकवली : शहरानजीक असणाऱ्या जिल्हा परिषद केंद्र शाळा वागदे नंबर १ येथील ४१ विद्यार्थ्यांना पारिजात मुंबई या संस्थेच्या माध्यमातून मोफत शैक्षणिक किट वाटप करण्यात आले. गरजू व गरीब विद्यार्थ्यांनाही शिक्षण मिळाले पाहिजे हा उद्देश समोर ठेवून ही संस्था सेवाभावी वृत्तीने कार्य करत आहे.

पारिजात मुंबई, सुगंध जगण्यातला ही संस्था सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बरोबरच विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शैक्षणिक साहित्याचे देखील मोफत स्वरूपात वाटप करत आहे. दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट चे वाटप करून प्रत्येक विद्यार्थी शिक्षण प्रवाहात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आता पर्यंत २० हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही संस्था पोचली आहे. १२ वर्षापासून ही संस्था कार्यरत आहे. दरवर्षी वेगवेगळे उपक्रम सुरू असतात जे की दिवाळी पहाट, मराठी भाषा दिवस, ग्रीन अकादमी (वृक्ष लागवड), कथा वाचन स्पर्धांचे आयोजन केले जाते. गरजू आणि आर्थिक परस्थिती नसणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व सुद्धा ही संस्था स्वीकारते.

वागदे केंद्र शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला दप्तर, वह्या, पुस्तके, रायटिंग पॅड, चित्रकला वही, पेन, पेन्सिल असे लागणारे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच संदीप सावंत, संस्थेचे पदाधिकारी पी. एम. मसुरकर, विशाल सावंत, केतन सावंत, केतन तांबट, बबलू परब, शालेय समिती अध्यक्ष संजना घाडीगांवकर, निवृत्त शिक्षिका नयना केसरकर, शिक्षिका अपूर्वा सावंत, वैष्णवी परब, अंकिता परब, मानसी जातकर, पालकवर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी परब तर आभार अपूर्वा सावंत यांनी मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!