शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोमवारी वेंगुर्ले सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये देणार धडक
सिंधुदुर्ग : बोगस कागपत्रांच्या आधारे गुजरातच्या यशवंत अमरतलाल ठक्कर याला दाभोली येथील जमिनीचे बोगस खरेदीखत रजिस्टर करून देणाऱ्या वेंगुर्ले दुय्यम निबंधक यांना याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोमवार दि. २१ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता वेंगुर्ले येथील सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये धडक देणार आहे. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब, वेंगुर्ले तालुकाप्रमुख बाळू परब यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
बोगस कागदपत्रे आणि बनावट शेतकरी दाखला जोडून वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली येथील जमीन गुजरात अहमदाबाद येथील यशवंत अमरतलाल ठक्कर याने खरेदी केली आहे. बनावट कागदपत्रे असताना देखील दाभोलीचे तलाठी, मंडळ अधिकारी वेतोरे आणि दुय्यम निबंधक वेंगुर्ले यांनी आर्थिक संगनमताने गुजराती परप्रांतियाच्या नावे त्या जमिनीचे बोगस खरेदीखत करून त्याची शासकीय दस्तऐवजांवर नोंद घालून दिली आहे.त्यामुळे आता त्या शेजारी असलेली जमीन बळकावण्यासाठी गुजराती ठक्कर हा भाडोत्री गुंड महिलांना दाभोली येथे पाठवून स्थानिक मराठी महिलांना मारहाण करण्यास लावत आहे. परप्रांतीय लोक दाभोली येथे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे बोगस कागपत्रांच्या आधारे गुजराती ठक्कर याला खरेदीखत रजिस्टर करून देणाऱ्या वेंगुर्ले दुय्यम निबंधक यांना याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोमवार दि.२१ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता वेंगुर्ले येथील सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये धडक देणार आहे.