देवगड : सिगारेट पेटविण्यासाठी लायटर दिला नाही, या क्षुल्लक कारणावरून मध्यप्रदेशातील परप्रांतीय कामगार रितिक यादव (20) याने आपल्या चुलत भाऊ कृष्णकुमार यादव (20) याच्या डोक्यात ट्रकच्या टॉमीने प्रहार करून निर्घृण हत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी वरेरी कुळये सडेवाडी येथील चिरेखाणीवर उघडकीस आली. पोलिसांनी रितिक यादवला ताब्यात घेतले असून, या घटनेने देवगड तालुका हादरला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम व विभागीय अधिकारी घनश्याम आढाव यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले. तपास देवगड पोलीस निरीक्षक भरत धुमाळ करीत आहेत.