पोलीस घटनास्थळी दाखल
कणकवली : कणकवली पोलीस स्टेशन पासून काहीशा अंतरावरील भालचंद्र ज्वेलर्स चोरट्यांनी फोडून लाखो रुपयांची सोने व चांदीचे दागिने लंपास केले. घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. ही घटना बुधवारी पहाटे 3 वा. च्या सुमारास घडली. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अतुल जाधव, हवालदार विनोद चव्हाण, व त्यांची टीम घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. त्यावेळी सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोरटे कोणत्यातरी हत्याराने शटरचे कुलूप तोडताना दिसत आहेत. काही वेळात ठसे तज्ञ व श्वानपथक दाखल होणार आहेत.