कणकवली – शहरातील विद्यानगर येथील रहिवासी सुवर्णकार प्रशांत सदानंद साटविलकर 52 यांचे मंगळवारी सायंकाळी खाजगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले.
गेले काही महिने ते आजारी असल्याने त्यांच्यावर मुंबई येथे उपचार करण्यात आले होते. गेले दोन दिवसांपूर्वीच पुन्हा त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना कणकवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बाजारपेठेतील आंबेआळी येथे साटविलकर ज्वेलर्स या नावाने त्यांचे फर्म होते. हसमुख चेहरा व विनोदी स्वभावामुळे ते सर्वत्र परिचित होते. त्यांचा मित्रपरिवार देखील मोठा होता. सुवर्णकारांच्या कार्यक्रमात तसेच सामाजिक कार्यात देखील ते सक्रिय असत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पंचायत समितीच्या कर्मचारी प्रणाली साटविलकर यांचे ते पती होत. त्यांच्या पाश्चात वडील,आई, पत्नी, मुलगा, दोन विवाहित भाऊ, भावजय असा परिवार आहे.