27.4 C
New York
Monday, July 14, 2025

Buy now

जयवंत भगवान बिरमोळे यांचे निधन | डॉ. प्रवीण बिरमोळे यांना पितृशोक

सिंधुदुर्ग : मालवणच्या ख्यातनाम अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल च्या अनेक माजी विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडविणारे शिस्तप्रिय म्हणून ओळख असलेले जयवंत भगवान बिरमोळे तथा “बिरमोळे सर” (वय 91) यांचे काल रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. मालवण तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी घुमडे येथील स्मशान भूमी मध्ये आज सोमवारी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. याप्रसंगी जिल्ह्यातील त्यांचे अनेक माजी विद्यार्थी तसेच जिल्हा वासीय सरांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते.

“छडी वाजे छम छम !”च्या जुन्या काळातही कधीही छडीचा वापर न केलेले आणि तरीही आपल्या सौजन्य पूर्ण स्वभावाने शिस्तप्रिय विद्यार्थी घडविणारे सर म्हणून टोपीवाला हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्यात त्यांची ओळख होती.

डॉक्टर भगवान बिरमोळे, डॉक्टर भारती बिरमोळे – सावंत, व कणकवलीतील गुरुकृपा हॉस्पिटलचे प्रथितयश डॉक्टर प्रवीण बिरमोळे यांचे ते वडील होत. गुरुकृपा हॉस्पिटलच्या डॉक्टर शमिता बिरमोळे यांच्या ते सासरे होत. त्यांच्यावर आज घुमडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!