कणकवली – सिंधुदुर्ग जिल्ह्यात उबाठा मध्ये राजकीय त्सुनामी चे संकेत मिळत असून ठाकरे गटाचे नेते विधानसभाप्रमुख सतीश सावंत हे मंत्री नितेश राणेंसोबत एकाच व्यासपीठावर हास्यविनोद करताना आढळून आले. त्यामुळे 2019 सालापासून मागील 6 वर्षे सावंत यांनी पत्करलेला नितेश राणे विरोध आता बदलत्या राजकीय परिस्थिती नुसार मवाळ केल्याचे दिसत असून पुन्हा एकदा राणे-सावंत एकत्र येतील अशी चर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आहे. आज नामदार नितेश राणे आणि ठाकरे गटाचे नेते सतीश सावंत एकाच व्यासपीठावर येण्यासाठी 13 जुलै रोजी सकाळी कनेडी प्रशालेच्या कार्यक्रमाचे निमित्त झाले. पण एकाच व्यासपीठावर आलेले मंत्री नितेश राणे आणि ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख सतीश सावंत हे एकमेकांशेजारी बसले. नुसते एकमेकांशेजारी बसले नाही तर हास्यविनोद करतानाचे फोटो सुद्धा व्हायरल झाले. आणि तत्कालीन राणे समर्थक असलेले माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत हे 2019 साली ऐन विधानसभा निवडणुकी आधी राणेंची साथ सोडून उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेत गेले. लागलीच सतीश सावंत याना भाजपा पक्षाचे उमेदवार नितेश राणेंविरोधात कणकवली विधानसभेतून उमेदवारीही देण्यात आली. 2019 साली नितेश राणेंना पराभूत करण्यासाठी सतीश सावंत यांनी जंग जंग पछाडले. नितेश राणेंना पराभूत करण्यासाठी मातोश्री वरून संपूर्ण रसद सुदधा सतीश सावंत याना पुरविण्यात आली. मात्र प्रत्यक्षात निवडणूक निकाल जाहीर झाला तेव्हा घासून नाही तर ठासून सतीश सावंत याना पराभवाची धूळ चारून नितेश राणे दुसऱ्यांदा विजयी झाले. तेव्हापासून सतीश सावंत हे राणेविरोधक झाले. विधानसभेनंतर झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकित सुद्धा खुद्द सतीश सावंत यांचा पराभव करून जिल्हा बँक सुद्धा नितेश राणेंनी भाजपाकडे राखली. मागील 6 वर्षांत राणेंचे विरोधक झालेले सतीश सावंत पुन्हा राणेंसोबत जातील अशी चर्चा कनेडी मधील कर्यक्रमात व्यासपीठावर मंत्री नितेश राणेंशी हास्यविनोद करताना सतीश सावंत आढळून आल्यामुळे सुरू झाली आहे.