-9.5 C
New York
Tuesday, January 27, 2026

Buy now

रस्त्यात अडवून तरुणीचा विनयभंग | वैभववाडी तालुक्यातील घटना

१९ वर्षीय युवकावर गुन्हा दाखल

वैभववाडी : रस्त्यात अडवून तरुणीचा विनयभंग केल्याची घटना खांबाळे येथे घडली आहे. विनयभंग करणारा आरोपी शुभम प्रमोद कदम वय १९ रा. खंबाळे मोहितेवाडी याच्यावर वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी सकाळी खांबाळे येथे घडली आहे.

आरोपी शुभम हा त्या पिढीतेला वारंवार त्रास देत होता. बुधवार दि. ९ जुलै रोजी सकाळी खांबाळे येथे आरोपी शुभमने त्या तरुणीला रस्त्यात गाठले. तिला हाताने ओढत नेत मनात लज्जास्पद कृत्य केले. व तिचा विनयभंग केला. पिडीत तरुणी व तिच्या आई-वडिलांनी याबाबतची तक्रार वैभववाडी पोलीस ठाण्यात दिली. वैभववाडी पोलिसांनी शुभम कदम या आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास एएसआय माधुरी आडुळकर करत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!