कणकवली : तालुक्यातील फोंडा बाजारपेठेती मच्छीमार्केट परिसरात दोन हजार रूपयांची गोवा बनावटीची दारू पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणी सदाशिव अशोक पडेलकर (वय ३२, रा.फोंडाघाट हवेलीनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ९ जुलै रोजी सायंकाळी ४.२० वाजता हवालदार सुभाष शिवगण यांनी केली.
फोंडाघाट बाजारपेठ तसेच मच्छीमार्केट परिसरात एक व्यक्ती गोवा बनावटीची दारू विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार हवालदार सुभाष शिवगण, पोलीस स्वप्नील ठोेंबरे यांनी मच्छीमार्केट परिसरात छापा टाकला असता सदाशिव पडेलकर याच्याकडे १८० मिलीच्या ब्रँडीच्या २२ बाटल्या आणि व्होडकाच्या १८ बाटल्या आढळून आल्या. याची किंमत सुमारे दोन हजार रूपये आहे. गोवा बनावटीच्या दारू विक्री प्रकरणी पडेलकर याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.