-8.7 C
New York
Tuesday, January 27, 2026

Buy now

दहावीतील अल्पवयीन मुलीला फूस लावून नेणाऱ्याला त्या मुलीसह घेतले ताब्यात

कणकवली : तालुक्यातील एका हायस्कुल मध्ये दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या दीपक जोतिराम माने ( वय 24, रा लांजा ) याला त्या अल्पवयीन मुलीसह कणकवली पोलिसांनी हातखंबा ,जिल्हा रत्नागिरी येथून ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय उल्हास जाधव, महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रणाली जाधव यांनी ही कामगिरी हातखंबा येथे पार पाडली
4 जुलै रोजी शाळेत जाते असे सांगून ती मुलगी वडिलांचा मोबाईल घेऊन घरातून बाहेर पडली. पण शाळेत गेलीच नाही. मुलगी घरी न आल्यामुळे त्या मुलीच्या वडिलांनी अज्ञाताने आपल्या अल्पवयीन मुलीला फूस लावून तिचे अपहरण केल्याची फिर्याद 4 जुलै रोजी कणकवली पोलीस ठाण्यात दाखल केली होती . अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या मोबाईल चे लोकेशन, सिडीआर आदी बाबींचा तपास कणकवली पोलिसांकडून सुरू होता. दरम्यान त्या मुलीकडील मोबाईल लोकेशन हातखंबा येथे आढळताच पीआय अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय उल्हास जाधव, महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रणाली जाधव यांचे पथक हातखंबा येथे गेले. हातखंबा गावात पांडवळ फाटा येथे संशयित आरोपी दीपक माने याच्या घरात दीपक आणि अपहरण झालेली मुलगी आढळून आली.
त्या मुलीसह संशयित आरोपीला ताब्यात घेऊन पीएसआय जाधव यांनी कणकवली पोलीस ठाण्यात आणले. पुढील कारवाई सुरू होती. दरम्यान
दहावीत शिकणाऱ्या त्या मुलीची इन्स्टाग्राम वर संशयित दीपक मानेशी ओळख झाली असे समजते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!