विविध कार्यक्रमांचे आयोजन
कणकवली : गुरुपौर्णिमेनिमित्त कणकवली येथील प.पू. देवी अनुसयामाता विश्रांतीधाम आश्रम कणकवली येथे गुरुपौर्णिमा उत्सव उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी १० जुलै २०२५ रोजी सकाळी १० ते ११ वाजता परमहंस श्री भालचंद्र बाबांच्या तसेच श्री गुरुवर्य फलाहरी बाबांच्या पादुकांचे पूजन, ११ ते ११:३० वाजता प.पू. देवी अनुसया आता यांच्या समाधीचे पूजन, १२ ते १ वाजता सुश्राव्य भजन, १ ते १:३० वाजता आरती व तिर्थप्रासाद, दुपारी १:३० ते ३ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७:३० ते ८:३० सुश्राव्य भजन -प. पू. देवी अनुसया माता विश्रांतीधाम महिला मंडळ, रात्रौ ८:३० ते ९:३० वाजता शेज आरती असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन संचालक मंडळ प. पु. देवी अनुसया माता विश्रांतीधाम आश्रम नावगे रोड निम्मेवाडी च्या वतीने करण्यात आले आहे.