26.5 C
New York
Wednesday, July 9, 2025

Buy now

कलमठ वीज पुरवठ्यातील अडचणीमुळे उपकरणांचे नुकसान

ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांचा नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पुढाकार

कणकवली | मयुर ठाकूर : कलमठ येथील काही भागांत वारंवार होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या अडथळ्यांमुळे अनेक नागरिकांचे विद्युत उपकरणे जळून खराब होत आहेत. नुकतेच श्री प्रसाद सुरेंद्र मुसळे यांच्या घरातील विजेच्या अत्याधिक दाबामुळे वायरिंग,पंप, CCTV कॅमेरा, LED बल्ब यांसारखी उपकरणे खराब झाली. त्यांनी या संदर्भात महावितरण सहाय्यक अभियंता यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

यासंदर्भात ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांनी सांगितले की, ज्या नागरिकांचे अशा प्रकारे नुकसान झाले असेल त्यांनी ग्रामपंचायतमध्ये किंवा महावितरण कार्यालयात अर्ज करून नुकसान भरपाईसाठी पुढाकार घ्यावा.

तसेच, अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येक घरात ELCB (Earth Leakage Circuit Breaker) बसविणे अत्यंत गरजेचे आहे. ELCB हे उपकरण घरातील वीज पुरवठ्यात कोणतीही गळती (leakage) किंवा अचानक वाढलेला दाब आल्यास वीज पुरवठा तात्काळ बंद करते. त्यामुळे आग लागणे, शॉक लागणे किंवा उपकरणांचे नुकसान होणे टाळता येते.

सावधगिरी हीच सुरक्षा!

आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी त्वरित ELCB बसवा आणि विजेचे उपकरणे सुरक्षित ठेवा, असे आवाहन ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!