-6.2 C
New York
Monday, December 15, 2025

Buy now

प्रिया चव्हाण आत्महत्याप्रकरणी संशयितांना अटकपूर्व जामीन मंजूर

ओरोस : सावंतवाडी माठेवाडा येथील विवाहीता सौ. प्रिया पराग चव्हाण हीला आत्महत्येल प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या देवगडच्या माजी नगराध्यक्षा प्रणाली माने व त्यांचा मुलगा आर्य माने याना अतिरीक्त सत्र न्यायाधिश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी ११ जुलै २०२५ पर्यंत प्रत्येकी २५ हजार रुपयांचा अंतरीम अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे.

दि. ४ जुलै २०२५ रोजी सौ. प्रिया हीने तीच्या राहत्या घराच्या बेडरुममध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. याबाबत ६ जुलै रोजी तीचे वडिल विलास

तावडे रा. कलंबिस्त यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतिय न्याय संहिता कलम १०८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत दोन्ही संशयितांच्यावतीने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

त्यावर झालेल्या सुनावणीत ११ जुलैपर्यंत प्रत्येकी २५ हजार रुपयांचा अंतरीम अटकपूर्व जामिन मंजूर करण्यात आला आहे. यात तपासात सहकार्य करावे, तसेच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पुराव्यात ढवळाढवळ करू नये, असे आदेश सत्र न्यायालयानें दिले आहेत. संशयितांच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!