23.5 C
New York
Wednesday, July 9, 2025

Buy now

चिंदर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी महेंद्र मांजरेकर विजयी

मालवण : चिंदर ग्रामपंचायत उपसरपंचपदी श्री देव रामेश्वर ग्रामविकास आघाडी चिंदरचे महेंद्र मधुकर मांजरेकर हे विजयी झाले आहेत. उपसरपंच दीपक सुर्वे यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्याजागी महेंद्र मांजरेकर यांची निवड झाली आहे. सरपंच सरपंच नम्रता यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामपंचायत अधिकारी भगवान जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. उपसरपंच पदासाठी महेंद्र मांजरेकर यांच्यासह शशिकांत नाटेकर, केदार परुळेकर यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. मात्र, निवडणुकीपूर्वी केदार परुळेकर यांनी अर्ज मागे घेतला. गुप्त मतदान प्रक्रिया पार पडली. ग्रामपंचायतच्या ९ सदस्यांनी त्यासाठी मतदान केले. महेंद्र मांजरेकर यांना ६ मते तर शशिकांत नाटेकर यांना २ मते पडली. तर एक मत बाद झाले. श्री देव रामेश्वर आघाडी चिंदर म्हणून आम्ही पाच वर्षापूर्वी निवडणूक लढवली. त्यानंतर सरपंच, उपसरपंच यांना नेहमीच माझा पाठिंबा राहिला. गाव विकास हेच आमचे स्वप्न राहिले. उर्वरित सहा महिन्यातही गावाच्या विकासासाठी आमचे प्रयत्न राहतील असे उपसरपंच महेंद्र मांजरेकर यांनी सांगितले. मोठे भौगोलिक क्षेत्र असलेल्या चिंदर गावच्या ग्रामपंचायत उपसरपंच निवडणूक बिनविरोध व्हावी हिच अपेक्षा होती. मात्र गावात राजकारण आणण्याचा प्रयत्न झाला. भाजपचा तालुकाध्यक्ष असल्याने मला घेरण्याचा प्रयत्न झाला. हा घेरण्याचा प्रयत्न कोणी केला. ज्यांच्याकडे पैशाचा माज आला आहे, गावात जाऊन पैशाच्या जोरावर आम्ही लोकांना विकत घेऊ शकतो तो माज उतरविण्याचे काम या निवडणुकीच्या माध्यमातून झाले आहे. श्री देव रामेश्वर ग्रामविकास आघाडी ग्रामपंचायत चिंदरचे सरपंच २०२१ ला विराजमान झाले. त्यावेळी महेंद्र मांजरेकर यांनी निर्णायक पाठिंबा हा आमच्या पॅनलला दिला. गेली साडे चार वर्षे ते आमच्यासोबत ठाम राहिले. आता ग्रामविकास आघाडीच्या पाठिंब्याने ते उपसरपंच पदी विराजमान झाले आहेत. हे होत असताना गावागावात भाजपाच्या कार्यकर्त्यांना आपापसात भिडवण्याचे जे काम सुरु आहे. ते वाईट आहे आणि निंदनीय आहे. मी खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हे सर्व निदर्शनास आणून देणार आहे. ज्या भाजपा कार्यकर्त्यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जीवाचे रान केले त्यांना अशाप्रकारे आपापसात कोण भिडवण्याचे काम करत आहेत, त्याबाबत यांनी लक्ष द्यावे. आगामी निवडणुका एकसंघ पणे लढवण्याच्या दृष्टीने आपण एक संघ असणे आवश्यक आहे. त्यात वरिष्ठानी लक्ष घालावे. मी प्रामाणिक पणे पक्षाचे काम करणारा कार्यकर्ता आहे. पद आणि पैसा हे मी कधी स्वार्थ ठेवले नाही. माझ्या गावातील लोकही अशाच प्रकारे प्रामाणिक आहेत. भाजपाच्या बाबतीत कुठलीही तडजोड सहन करणार नाही. कार्यकर्त्यांची मने दुखावली जाणार नाही याची काळजी वरिष्ठानी घ्यावी. आपण महायुती म्हणून एकसंघपणे पुढे जाणे हे अत्यंत गरजेचे आहे. मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. पक्षासाठी प्रामाणिक काम करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. त्यामुळे वरिष्ट नक्कीच लक्ष घालतील् असे चिंदरकर यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!