वीस वाहनांवर दंडात्मक कारवाई
कणकवली : शहरातील मुख्य आप्पासाहेब पटवर्धन चौकाने मंगळवारी मोकळा श्वास घेतला आहे. वाहनचालक आपल्या सॊईनुसार वाहन पार्किंग करून निघून जात असत. त्यामुळे कणकवली शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौकात मोठी वाहतूक कोंडी होत होती. वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण यांनी उपाययोजना करून पटवर्धन चौक मोकळा केला होता. मात्र त्यानंतर पुन्हा याचठिकाणी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. दरम्यान पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली पटवर्धन चौक वाहतूक कोंडी मुक्त केला. त्यानंतर ट्रिपल सिट, वाहतुकीस अडथळा, वाहनचालक परवाना नाही, नंबर प्लेट नाही, फॅन्सी नंबर प्लेट लावून वाहन चालविणे असे एकूण २० वाहनांवर कारवाई करून १६५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
ही कारवाई कणकवली पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण व दिलीप पाटील यानी केली आहे.
कणकवली शहरात होत असलेली वाहतूक आणि वाहन नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर देखील पुढे कारवाई होणार असल्याचेही यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी वाहने पार्किंग करू नका असे आवाहन देखील पोलीस यंत्रणेच्या वतीने करण्यात आले आहे.