29.8 C
New York
Sunday, July 6, 2025

Buy now

उबाठाला कणकवलीत लागोपाठ दुसरा धक्का

करंजेतील ग्रामस्थांचा भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश

पालकमंत्री ना. नितेश राणेंनी केले स्वागत

कणकवली : तालुक्यातील करंजे येथील उबाठा सेनाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या माध्यमातून होणाऱ्या विकास कामांचा आढावा घेत भारतीय जनता पार्टी पक्षात पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी हा पक्ष प्रवेश संपन्न झाला. उबाठा सेनेला कसवण मागोमाग करंजे गावात देखील मोठा धक्का बसला आहे.

पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यामध्ये विनायक कांबळे ( भिरवंडेकर ), निलेश कदम, सुनील जाधव, सतीश कदम, लक्ष्मण कदम, रविराज कदम, विनय कदम, किशोर कदम, श्रीकांत कदम, विशाल कदम, अनिकेत कदम, प्रियांका कदम, सोनल कदम, ज्योस्ना कदम ( माजी ग्रा. पं. सदस्या ), सुरेखा जाधव, सविता कदम, प्रणाली कदम, सुमन कदम, सौरभ कदम यांचा समावेश आहे.

यावेळी पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी गावच्या विकासासाठी जो काही निधी लागेल किंवा आमची जी काही मदत लागेल ती आम्ही अवश्य करू, असा विश्वास देखील प्रवेशकर्त्याना दिला.

यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संदेश ( गोट्या ) सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, करंजे सरपंच सपना मेस्त्री, माजी उपसरपंच राजन चिंदरकर, कळसुली सरपंच सचिन पारधीये, अनिल सावंत, माजी सरपंच मंगेश तळगावकर, ग्रामस्थ आशितोष मेस्त्री आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!