23.4 C
New York
Sunday, July 6, 2025

Buy now

१०८ रुग्ण वाहिका चालकांच्या मागण्या पूर्ण करनार – पालकमंत्री नितेश राणे

BVG कंपनीच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्र्याच्या सूचना

चालकांच्या मागण्या सोमवार पर्यंत लेखी स्वरूपात देण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

सिंधुदुर्गनगरी : १०८ रुग्णवाहिका चालकांनी दि १ जुलै रोजी बेमुदत संपाची घोषणा करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन केले होते. जिल्ह्यातील रुग्णवाहीका सेवा पूर्णपणे ठप्प करून आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमुदत संपाची घोषणा १०८ रुग्णवाहीका चालकांनी केली होती. यावर जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी गांभीर्याने दखल घेत आंदोलनकर्त्यांशी फोनवर चर्चा करत संप मागे घेण्यास सांगितले.

शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक सार्वजनिक व वैयक्तिक प्रश्नांना मार्ग मिळाला. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गनगरी येथील संपर्क कार्यालयात थेट जनतेशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अनेक रखडलेली प्रकरणे यावेळी निकाली काढण्यात आली, तर काही प्रलंबित विषयांवर संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देण्यात आल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या संपर्क कार्यालयात सायंकाळी तीन ते सात एवढा वेळ जनतेसाठी ठेवला होता. यावेळी जनतेची प्रचंड गर्दी त्यांना भेटण्यासाठी झालेली होती. यावेळी १०८ टोल फ्री रुग्णवाहिका चालकांनी अपुऱ्या सुविधांचा पाढाच पालकमंत्री नितेश राणे यांच्या समोर मांडला यात चालकांचे पगारवाढ, चालकांची राहण्याची व्यवस्था, चालकांचा कॅशलेस जीवन विमा, सर्व कायदेशीर रजा,अश्या अनेक मागण्या रुग्णवाहिका चालकांनी मांडल्या. यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी BVG कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक विनायक पाटील, सूरज लाड या अधिकाऱ्यांना धारेवर धरत यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करा व त्या बाबतचे लेखी पत्र मला व या चालकांना सोमवार पर्यंत द्या अशी सूचना देण्यात आली.
पालकांमंत्री नितेश राणे यांच्या संपर्क कार्यालयात नागरिकांनी मांडलेल्या समस्यांमध्ये मच्छीमार, वीज वितरण अडचणी, एसटी बस वाहतूक सेवा, शिक्षक भरतीचे प्रश्न हे ठळक होते.विशेष बाब म्हणजे, याच वेळी सिंधुदुर्गनगरीला नगरपंचायत घोषित करण्याचा मागणीवरही निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे स्थानिक नागरी सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार असल्याचे संकेत पालकमंत्र्यांनी दिले. आम्ही जनतेचे सेवक आहोत प्रशासकीय यंत्रणा ही जनतेसाठी आहे, त्यामुळे प्रत्येक नागरिकाचा प्रश्न प्राधान्याने सोडवला जाईल असा विश्वास पालकमंत्री राणे यांनी व्यक्त केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!