27 C
New York
Saturday, July 5, 2025

Buy now

शाळकरी मुलांना वारकरी ज्ञान मिळणे ही भाग्याची गोष्ट

प्राथमिक शाळा वागदे डंगळवाडी नं. २ येथे आषाढी एकादशी निमित्ताने वारकरी दिंडी संपन्न

शाळकरी विद्यार्थ्यांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग

कणकवली : आषाढी एकादशी निमित्ताने सध्या जिकडेतिकडे वारकरी लोकांचे विविध कार्यक्रम सुरू आहेत. मात्र या कार्यक्रमाला शाळकरी मुलांकडून मूर्त स्वरूप देण्यात आले आहे. शाळकरी मुलांना वारकरी ज्ञान मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे, असे प्रतिपादन मुख्याध्यापिका वेदिका चव्हाण यांनी केले.

कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वागदे डंगळवाडी नं. २ येथे एकादशीनिमित्त वारकरी दिंडी काढण्यात आली. पंढरीचा वारकरी जसा आषाढी एकादशी च्या निमित्ताने पंढरीची वारी करतो तसेच शाळकरी विद्यार्थ्यांनी देखील वारकरी वेशभूषा करून टाळ, मृदुंग आणि भक्तिगीते, अभंग म्हणत या वारकरी दिंडीत उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. ‘जय जय रामकृष्ण हरी’, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’, ‘विठू माऊली तू…’ असे अभंग यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या परीने सादर केले. यावेळी उत्साही व आनंदी वातावरणात निर्माण झाले होते. दरम्यान यावेळी बांधावरची शाळा हा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमात वागदे केंद्राचे केंद्रप्रमुख सूर्यकांत परशुराम चव्हाण, शिक्षण प्रेमी अस्मिता परब, मुख्याध्यापिका वेदिका चव्हाण, उपशिक्षिका तन्वी आपटे, ग्रामपंचायत सदस्या संजना गावडे, सुहास गावडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश तोरस्कर, उपाध्यक्ष साक्षी आमडोस्कर, अंगणवाडीच्या शिक्षिका सुनीता ताटे, अंगणवाडी मदतनीस रोशनी कदम जानवी मेस्त्री, विद्या मेस्त्री, अस्मी आमडोस्कर, अंगणवाडीचे विद्यार्थी तसेच पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!