20 C
New York
Saturday, July 5, 2025

Buy now

बाल शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये दुमदुमला “ज्ञानोबा माऊली तुकाराम”चा जयघोष

कणकवली : येथील बाल शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शनिवारी आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा केली होती. मुलांनी वारकरी संप्रदायातील पोशाखात सहभागी होत वारीचे वातावरण निर्माण केले. शाळेत सुंदर पालखी सजवण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी टाळ, मृदुंग व अभंगाच्या गजरात पालखीची मिरवणूक काढली. “ज्ञानोबा माऊली तुकाराम” चा जयघोष करत सर्व परिसर भक्तिमय झाला. या कार्यक्रमात ‘वारीचे महत्त्व’, ‘एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक मूल्य’ यावर शिक्षकांनी माहिती दिली.

मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत वारीच्या परंपरेचे महत्त्व समजावून सांगितले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभाव आणि सांस्कृतिक जागृती निर्माण झाली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये धार्मिकता, सामाजिकता आणि परंपरेबद्दल आदर निर्माण होतो.
संपूर्ण कार्यक्रम अत्यंत यशस्वी व प्रेरणादायी ठरला. सदर कार्यक्रमासाठी अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्था मुंबई या संस्थेच्या सचिवसुलेखा राणे, संस्थेच्या समन्वयक प्रणाली सावंत आणि संस्थेचे संचालक संदीप सावंत यांचे मोलाचे मागदर्शन लाभले. सदर कार्यक्रमासाठी परशुराम झगडे देखील उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!