दीड तास तुतारी एक्सप्रेस कणकवली रेल्वे स्थानकात उभी
वेर्णे – गोवा येथून पर्यायी इंजिन मागविले
बिघाड वेळीच लक्षात आल्याने पुढील दुर्घटना टाळली
कणकवली : मुंबई वरून गोव्याच्या दिशेने जाणारी तुतारी एक्सप्रेस ( ११००३ ) ही ११:३७ वा. कणकवली रेल्वे स्थानकात आली. दरम्यान या तुतारी एक्सप्रेस च्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तुतारी एक्सप्रेस कणकवली बस स्थानकात साधारणपणे दीड तास उभी होती. मोटारमॅनने दुरुस्तीसाठी प्रयत्न केले. परंतु दुरुस्तीनंतर देखील गाडी इंजिन सुरू होऊन बंद पडले.
यावेळी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना इंजिन बिघाडाची माहिती दिली. तसेच पर्यायी इंजिन येईपर्यंत तुतारी एक्सप्रेस कणकवली रेल्वे स्थानकातच उभी राहील असेही, सांगण्यात आले. पर्यायी इंजिन हे वेर्णे – गोवा येथून रवाना कणकवलीच्या दिशेने मार्गस्थ झाले असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले. या सर्व प्रकारामुळे प्रवाश्यांचे हाल झाले मात्र बिघाड वेळीच निदर्शनास आल्याने पुढील दुर्घटना टळली आहे.