-7.5 C
New York
Tuesday, January 27, 2026

Buy now

पेट्रोल ओतून जाळून घेतले ; तिघांवर गुन्हा दाखल

कुडाळ : सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेने स्वतःवर पेट्रोल ओतून जाळून घेतल्याचा प्रकार नेरूर- रावलेवाडी येथे घडला आहे. अंकीता रणबीर कदम (वय ३०) असे तिचे नाव आहे. ही घटना २ जुलैला रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली.

दरम्यान या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार तिघांच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी अंकिता हिच्यावर ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. ती गंभीररित्या भाजली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,जखमी अंकिताचे वडील सुभाष झिलू नेमण (मूळ रा. मातोंड – गोवळवाडी, सध्या रा. नेरुर- रावलेवाडी) यांनी कुडाळ पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अंकिताचे पती रणबीर प्रकाश कदम (वय ३५, रा. खांदरवाडी- नाटळ), सासरे प्रकाश गणपत कदम (वय ७०) व सासू या तिघांविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल अंकिताचे सासरे प्रकाश कदम यांनी अंकिताला रिक्षाने आणून माहेरी सोडले. ही काही काम करत नाही, हिला माहेरीच ठेवून घ्या, असे सांगून ते निघून गेले आणि रात्री अंकिताने आत्महत्येचा प्रयत्न केला. सासरी अंकिताचा छळ होत होता. त्यामुळे त्यांनी तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे, वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास एपीआय वैशाली आडकुर करीत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!