30.6 C
New York
Thursday, July 3, 2025

Buy now

करूळ घाटात अपघात, ट्रक चालक सुदैवाने बचावला

वैभववाडी : चालकाचा ताबा सुटल्याने करूळ घाटात संरक्षक कटड्याला धडकून अपघात झाला. सुदैवाने ट्रक कठड्याला धडकून तिथेच थांबला. अन्यथा दरीत कोसळून मोठा अपघात झाला असता. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली.

चालक सुनील गेनू जाधव वय ३८ रा. आनंद नगर कासार्डे हा आपल्या ताब्यातील ट्रक घेऊन कोल्हापूर ते कासार्डे असा प्रवास करीत होता. ट्रक करूळ घाटात आला असता चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक घाटातील संरक्षक कटढ्याला धडकला. सुदैवाने ट्रक तिथेच थांबल्यामुळे मोठा अपघात टाळला. अन्यथा ट्रक दरीत कोसळून मोठा अपघात घडला असता. अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. अपघाताची माहिती समजताच वैभववाडी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी आपल्या सहकारी रघुनाथ जांभळे व इतर कर्मचाऱ्यांसह धाव घेत अपघाताची माहिती घेतली. तसेच वाहतूकीला कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही.याची खबरदारी घेतली त्यामुळे घाटातील वाहतूक सुरळीत सुरु होती.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!