28.9 C
New York
Tuesday, July 1, 2025

Buy now

कणकवलीत चाकू हल्यात एक गंभीर

धार्मिक कार्यक्रमात प्राण्यांचा बळी देऊ नका अशा व्हॉटसअॅप मेसेजवरुन घडला प्रकार

कणकवली : शहरातील बांधकरवाडी येथे धार्मिक कार्यक्रमात प्राण्यांचा बळी देऊ नका असा मेसेज व्हॉटसअॅपवर पाठवल्यावरून येथील सचिन पवार याच्यावर चाकू
हल्‍ला करण्यात आला आहे. मंगळवारी कणकवली शहरातील बांधकरवाडीत सायंकाळी ४ वा. च्या सुमारास हा प्रकार घडला. सचिन पवार हे शिरवंडे येथे ग्रामसेवक म्‍हणून कार्यरत आहेत . सचिन पवार हे सायंकाळी ४ वा. च्या. सुमारास अापल्‍या घरी आले, असता त्‍यांच्याच नातेवाईकांपैकी १५ ते १६ जण त्‍यांच्या घरी आले. यातील तिघांनी आपणास मारहाण केली. तर एकाने धारदार शस्त्राने आपल्‍या छातीवर, पोटावर वार केले असल्‍याचा आरोप सचिन पवार यानी केला आहे.
बांधकरवाडी येथील हल्‍ला प्रकाराच्या घटनेनंतर कणकवली पोलिसांनी जखमी सचिन पवार याला कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयात दाखल केले होते. तेथे त्‍याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्‍यान कणकवली पोलीस ठाण्यातही ११२ क्रमांकावरून बांधकरवाडी येथे हाणामारीच्या घटनेची तक्रार करण्यात आली होती. त्‍या तक्रारीनुसार कणकवली पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले होते.
कणकवली बांधकरवाडी येथे पवार कुटुंबीयांचा दरवर्षीप्रमाणे धार्मिक कार्यक्रम होता. या कार्यक्रमात बकरा, कोंबडी आदी प्राण्यांची हत्‍या करू नका असा मेसेज सचिन पवार व्हॉट्‌सॲप ग्रुपवर पाठवला होता. या मेसेजनंतर वादाला सुरवात झाली. सायंकाळी साडे तीन वाजल्‍यानंतर सचिन पवार हा बांधकरवाडी येथील आपल्‍या घरी दाखल झाला. त्‍यावेळी त्‍याचे नातेवाईक त्‍याच्या घरासमोर जमा झाले. तसेच मेसेज पाठविल्‍या प्रकरणावरून भांडण सुरू झाले. या भांडणात आपणास मारहाण करण्यात आली. तसेच छाती, पोटावर वार करून जखमी करण्यात आल्‍याचे सचिन पवार याचे म्‍हणणे आहे.
दरम्यान सचिन पवार यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार काही ना काही कारणावरून आम्हाला वाळीत टाकल्याप्रमाणे वागणूक मिळत होती. मात्र आम्हाला कोणत्याच कार्यक्रमात सभागी होता येत नव्हतं, तसेच नेहेमी जीवघेण्या धमक्या, मुलांना वाटेत मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. त्यामुळे आमच्या जीवितास देखील धोका आहे, अस सचिन पवार यांच्या पत्नीचे म्हणणे आहे. या घटनेप्रकरणी दोन्ही बाजूंचे म्‍हणणे ऐकून पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!