10.5 C
New York
Saturday, March 21, 2026

Buy now

कुडाळ पोलीस ठाण्याच्या वतीने अंमली पदार्थ विरोधी दिन विविध उपक्रमांनी साजरा

कुडाळ : अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून कुडाळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये विविध कार्यक्रम राबविण्यात आले. कुडाळ हायस्कूल कुडाळ व जुनिअर कॉलेज मार्फत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मार्गदर्शन व जीत्याची खोड हा लघुपट दाखवण्यात आला. संत राऊळ महाराज कॉलेज येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच लघुपट दाखवण्यात आला. पणदूर हायस्कूल पणदूर येथे विद्यार्थ्यांना जित्याची खोड हा लघुपट तसेच मार्गदर्शन करण्यात आले. वसोली हायस्कूल, तुळसुली हायस्कूल , साळगाव डीएड कॉलेज मधील विद्यार्थ्यांना लघुपट तसेच अमली पदार्थ बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. कुडाळ एसटी स्टँड, कुडाळ रेल्वे स्टेशन येथे अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सह्यांची मोहीम राबविण्यात आली. या दिनानिमित्त केमिस्ट व ड्रगिस्ट, औषध विक्रेते दुकानदार व पुरवठादार यांची पोलिस ठाणे येथे मीटिंग आयोजित करण्यात आली. कुडाळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये राबविण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमांमध्ये या दिवसाचे महत्त्व पटवून तरुण पिढीवर होणाऱ्या परिणामाचे गांभीर्य पटवून देण्यात आले. त्याचप्रमाणे भविष्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाचे सहकार्य प्राधान्याने राहील याबाबत आश्वस्त करण्यात आले. सर्व कार्यक्रमांमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी सावंतवाडी विनोद कांबळे, तसेच कुडाळ पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, स पो निरीक्षक श्रीमती आडकुर, पोलीस उपनिरीक्षक श्री धडे, श्री. भांड, श्री. पाडावे तसेच कुडाळ पोलीस ठाणे कर्मचारी यांनी यात सहभाग घेतला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!