2.3 C
New York
Friday, January 23, 2026

Buy now

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त कणकवलीत जनजागृती रॅली

कणकवली | मयुर ठाकूर : जागतिक अंमलीपदार्थ विरोधी दिनानिमित्त कणकवली शहरात कणकवली पोलीस ठाणे व एस एम हायस्कूल कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती रॅली काढण्यात आली होती. या रॅली ची सुरुवात कणकवली पटवर्धन चौक येथून करण्यात आली. कणकवली बस स्थानक ते पटवर्धन चौक अशी सदरची रॅली काढण्यात आली. यादरम्यान नशा सोडा घर जोडा, अमली पदार्थ बंद झालेच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या.

दरम्यान कणकवली पटवर्धन चौक येथे सिंधुदुर्ग जिल्हा अंमली पदार्थ मुक्त झाला पाहिजे यासाठी प्रत्येकाने शपथ घेतली पाहिजे. यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

यावेळी कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव, महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे, हवालदार विनोद चव्हाण, श्री. पाटील, महिला पोलीस नाईक विनया सावंत, स्वप्नाली कांबळे, देवेंद्र जाधव, एस एम एस स्कूलचे शिक्षक व एनसीसी चे विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!