32.9 C
New York
Wednesday, June 25, 2025

Buy now

दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी | हरकुळ काळेथरवाडी येथील घटना

कणकवली : तालुक्यातील कनेडी – नरडवे मार्गावर काळेथरवाडीनजिक दोन दुचाकी समोरासमोर आदळल्याने अपघात झाला. हा अपघात बुधवारी सायंकाळी ६:१५ वा. च्या सुमारास घडला. सदर अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कणकवली तालुक्यातील कनेडी – नरडवे मार्गावर काळेथरवाडी नजिक दोन दुचाकींचा अपघात झाला आहे. यामध्ये हिरो कंपनीच्या एचएफ डीलक्स ( एमएच ०७ एयु ४५५९ ) व टीवीएस कंपनीची एनटॉर्क ( एम एच ०७ एयू ६६१८ ) या दुचाकींच मोठं नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आनंद घाडी (वय ३४ रा. बेळगाव) व चिन्मय शिरसाठ (वय २५ रा. नाटळ) अशी अपघातग्रस्तांची नावे असून आनंद घाडी (वय ३४) यांचा मृत्यू झाला आहे. तर चिन्मय शिरसाठ हे गंभीर जखमी असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्तांना १०८ नंबर च्या रुग्णवाहिकेने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच आनंद घाडी यांचा मृत्यू झाला होता. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून आनंद घाडी यांना मृत घोषित केले.

अपघाताची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, पंकज पेडणेकर, नवराज झेमने, प्रफुल्ल काणेकर, उत्तम पुजारे आदींनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती. सदर अपघाताची कणकवली पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!