-7.5 C
New York
Tuesday, January 27, 2026

Buy now

अखेर महसूल अधिकारी सत्यवान माळवेसह प्राथमिक शिक्षक विनोद खंडागळे वर गुन्हा दाखल

एकाच नंबरची नंबरप्लेट लावणे भोवले

कणकवली : दोन वॅगणार कार ला एमएच एजी ८५३३ ही एकच नंबर प्लेट लावणे सहाय्यक महसूल अधिकारी सत्यवान माळवे आणि प्राथमिक शिक्षक विनोद खंडागळे या जोडीला भोवले असून दोघांवरही कणकवली पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेनुसार दखलपात्र तसेच मोटार व्हेईकल नुसार दखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण यांनी दिली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनोद सुपल करत आहेत. दरम्यान प्राथमिक शिक्षक विनोद खंडागळे यांच्या वॅगणार कार चे आरटीओ रजिस्ट्रेशन अद्याप कसे झाले नाही ? हा सवाल आहेच. कारण नवीन नियमानुसार कोणतीही नवीन गाडी खरेदी केल्यानंतर तात्काळ गाडीच्या शो रूम मधूनच आरटीओ कडे त्या गाडीचे रजिस्ट्रेशन होते.

गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर मिळूनच वाहन मालकाला दिले जाते. असे असताना खंडागळे यांच्या त्या वॅगणार कारचे रजिस्ट्रेशन कसे झाले नाही हा सवाल आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!