23.1 C
New York
Wednesday, July 2, 2025

Buy now

एकाच नंबरच्या दोन वॅगनआर पोलिसांनी घेतल्‍या ताब्‍यात

एक कणकवली तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी तर दुसरा शिक्षण विभागातील शिक्षक कर्मचारी

कणकवली : शहर तसेच जिल्ह्यात एकाच क्रमांकाच्या दोन वॅगनआर कार फिरत असल्‍याच्या तक्रारीनंतर कणकवली पोलिसांनी दोन्हीही कार चौकशीसाठी ताब्‍यात घेतल्या आहेत. यातील एक कार महसूल कर्मचाऱ्याची तर एक कार शिक्षकाची असल्‍याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी कणकवली पोलिसांनी आरटीओ अधिकाऱ्यांना कळविले असून आरटीओकडून दंडात्‍मक कारवाई होण्याची शक्‍यता आहे. दोन्ही वॅगर आर कार वापरणारे हे एकमेकांचे जवळचे मित्र आहेत. गेले अनेक महिने ते एकच क्रमांक दोन कार साठी का वापरत होते याबाबतचे गूढ मात्र कायम राहिले आहे.

कणकवली पोलिसांनी शुक्रवारी सकाळी सदरच्या दोन्ही वॅगनआर कार ताब्यात घेतल्या होत्या. या दोन्ही कारचा नंबर एमएच ०७ एजी ८५३३ असा आहे. यातील आरटीओ पासिंग झालेली कार सत्यवान भगवान माळवे (वय ४२, रा. कणकवली) यांची आहे. तर आरटीओकडून कार पासिंग न करता आपल्‍या मित्राच्या कारचा नंबर वापरकर्ता विनोद विठ्ठल खंडागळे (४०, रा. नाधवडे – वैभववाडी) हा असल्‍याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

याबाबत अधिक तपास पोलीस करत असून सदर कार मालकांची कागदपत्रे पडताळून आरटीओच्या माध्यमातून कायदेशीर कारवाई होणार असल्याची माहीत पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!