15.6 C
New York
Thursday, August 21, 2025

Buy now

शिवसेना पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्त कुडाळ तालुका शिवसेनेचा अनोखा उपक्रम

बेवारस गोवंशीय जनावरांना पशुखाद्याचे केले वाटप

कुडाळ: शिवसेना पक्षाचा स्थापना दिवस आज सगळीकडे मोठया उत्साहात साजरा होत आहे. शिवसेना मुख्य नेते एकनाथशिंदे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना पक्षाच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत.
या निमित्ताने आज कुडाळ तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज तुळसुली तर्फ माणगाव येथे आनंद वारंग यांनी सुरू केलेल्या बेवारस गोवंशीय जनावरांच्या गोशाळेत पशुखाद्य वाटप करण्यात आले.
बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी नेण्यात येणारी गोवंशीय जनावरे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांकडून नाईलाजाने सोडून दिलेली तसेच अन्य बेवारस जनावरे यांचे पालनपोषण आनंद वारंग हे तुळसुली तर्फ माणगाव याठिकाणी दोन वर्षांपासून श्रीकृष्ण गोवर्धन गोशाळेच्या माध्यमातून स्वकष्टातून कोणत्याही प्रकारची शासकीय किंवा अन्य मदत न घेता करत आहेत. याठिकाणी सुमारे ६० हुन अधिक गोवंशीय भाकड जनावरे दाखल आहेत.
या जनावरांना सुक्या चाऱ्याची कमतरता असल्याचे गोरक्षक स्वरूप वाळके यांनी लक्षात आणून दिल्यानंतर आज शिवसेना पक्षाच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने कुडाळ तालुका शिवसेना  पक्षाच्या वतीने या जनावरांसाठी आवश्यक असणारा सुका चारा सुपूर्द करण्यात आला.
यावेळी शिवसेना पक्षाच्या महिला सेना जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, शिवसेना नेते संजय पडते, शिवसेना जिल्हा सचिव दादा साईल, उप जिल्हाप्रमुख अरविंद करलकर रत्नाकर जोशी, रचना नेरुरकर, नगरसेवक श्रुती वर्दम,  पिंगुळी ग्रामपंचायत सदस्य मंगेश चव्हाण, अनिकेत तेंडोलकर, रेवती राणे, स्वरूप वाळके, शुभम नाईक, सुनील गायकवाड आदी उपस्थित  होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!