32.6 C
New York
Monday, June 30, 2025

Buy now

युवक राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी निशिकांत कडुलकर यांची नियुक्ती

कणकवली : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निशिकांत कडूलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्याहस्ते श्री. कडूलकर यांना नुकतेचे हे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी निशीकांत कडूलकर यांची युवक राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी ही नियुक्तीची शिफारस केली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून पक्षसंघटना मजबूत उभी करण्याबाबतच्या शुभेच्छाही नियुक्तीपत्रात देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याहस्ते निशीकांत कडूलकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गरजे, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, संजय बोरगे, प्रदेश सरीचटणीस आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस संजय तटकरे, प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावरकर, प्रदेश चिटणीस सुरेश गवस, केदार खोत, गणेश चौगुले आदी उपस्थित होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन करताना युवकांना एकत्रित करून समाजोपयोगी काम करा. आपले पुर्ण सहकार्य राहिल. तसेच युवक संघटन मजूबत करण्याचे आवाहन केले. तर सूरज चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्हयात युवकांची फळी वाढविण्यासाठी जोरदार काम करा. युवकांच्या चळवळीतून संघटना वाढीसाठी मोठी मदत होत असते. युवक प्रदेशाध्यक्ष म्हणून आपण तुमच्या पाठीशी असल्याचे सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!