बांदा : सावंतवाडी तालुक्याच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका तथा मुख्य सेविका सिंधू पवार यांचा सेवानिवृत्ती निमित्त बांदा बीट मधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. श्रीमती पवार या मुळच्या धुळे जिल्ह्यातील असून एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागात देवगड तालुक्यात त्यांची सर्वप्रथम नेमणूक झाली. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील वैभववाडी व सावंतवाडी तालुक्यामध्ये काम केले. सावंतवाडी तालुक्यातील अंगणवाडीत शासनाच्या विविध योजना राबविल्या. सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा बांदा येथे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी पर्यवेक्षिका ममता देसाई, सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका कामिनी कुडव, यांच्यासह बांदा बीट मधील अंगणवाडी सेविका वर्षा आगलावे, अर्चना आंबेलकर, किरण गावडे, देवयानी डेगवेकर, मानसी बांदेकर, तनुजा देसाई, रतन मोर्ये, सुरेखा सातार्डेकर, चारुशीला परब, गीतांजली सावंत, संचिता मंजिलकर, अनघा सावंत, मैथिली सावंत, ग्रीष्मा भोगले, वैष्णवी सातोस्कर, अक्षता सावंत, आरोही कासकर, सुरेखा शिरोडकर, सुगंधा परब, अंतरा मोडक, नेहा देसाई, अश्विनी राणे, अश्विनी परब, रिशिता नाटेकर, मनाली नाईक, नम्रता परब, रोहिणी गावडे, दीपा सावंत, लोचनी पालव, उमा भिसे, वैष्णवी राणे, आदिती धुरी, प्रिया कोठावळे, मयुरी कुडव, तृप्ती मेस्त्री, सिद्धी कोठावळे, गंगा भगत, तनुजा गडेकर, रंजना सावंत, प्रियंका राणे, नूतन निगुडकर, विजयालक्ष्मी शिरसाट, लक्ष्मी पोखरे, साक्षी गावडे, शामलता कासकर, शुभांगी भाईप, रितिका पंडित, दीप्ती भाईप, प्रतीक्षा तळगावकर, दीपिका बांदेकर, प्रियांका आमडोस्कर, हर्षदा शिरसाट, कीर्ती नाईक, गीता नाईक, सुप्रिया वारंग, अन्वी परब, श्रुती धुरी आदी उपस्थित होते.
श्रीमती पवार म्हणाल्या, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम करताना चांगला अनुभव मिळाला. येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे उत्तम सहकार्य मिळाल्यानेच आपण याठिकाणी काम करू शकलो. आभार वर्षा आगलावे यांनी मानले.