28.9 C
New York
Tuesday, July 1, 2025

Buy now

रेल्वे तिकिटासाठी आता OTP द्यावा लागणार

नवी दिल्ली : आता रेल्वेचे तिकीट बुकिंग करण्यासाठी आधार बेस ओटीपी (Otp Authentication) क्रमांक द्यावा लागणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही घोषणा केली आहे. १ तारखेपासून हा नियम लागू होणार आहे असे त्यांनी सांगितले आहे. मागील महिन्यात रेल्वेने तत्काळ तिकिट बुकिंगसाठी नवे नियम जाहीर केले होते.

नव्या नियमानुसार आता ग्राहकांना तिकिट बुक करण्यासाठी ओटीपी टाकणे अनिवार्य असणार आहे जेणेकरून ही प्रकिया पारदर्शक होणार आहे. याशिवाय रेल्वे मंत्रालयाने सांगितलेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या प्रवासापूर्वी २४ तास आधी अंतिम प्रवाशांची यादी (Chart) बनवली जाऊ शकते या कल्पनेची तयारीही रेल्वेने सुरु केली आहे. याची सध्या चाचपणी सुरू आहे. सध्याच्या घडीला तिकिट कन्फर्म आहे का हे केवळ ४ तास प्रवासाआधी कळते. अनेक वेळा अशा प्रसंगी संभ्रमाची परिस्थिती होते त्यावर मात करण्यासाठीही रेल्वे प्रयत्नशील राहणार आहे.

१ जुलैपासून तत्काळ तिकिट नोंदणीसाठी आधार जोडलेल्या प्रवाशांना बुकिंग मोबाईल अँप व आयआरसीटीसी (IRCTC) संकेतस्थळावर करता येणार आहे. आता १ जुलै पासून प्रवाशांना तत्काळ तिकिटासाठी ओटीपी अनिवार्य (Mandatory) करण्यात आले आहे. तत्काळ तिकिट (Computerised Passenger Reservation System) काऊंटरवर व अधिकृत एजंटकडून ओटीपी माध्यमातून बुकिंग करता येईल.

याखेरीज कठीण प्रसंगी मोठ्या प्रमाणातील ग्रुप बुकिंग होऊ नये म्हणून रेल्वेने ऐनवेळी बुकिंग चालू झाल्यानंतर अधिकृत एजंटकडून पहिल्या ३० मिनिटांत तिकिट घेण्यास अथवा विकण्यास प्रतिबंध केला आहे. वातानुकूलित (AC Class) साठी सकाळी १० ते १०.३० पर्यंत व विना वातानुकूलित (Non AC) साठी सकाळी ११ ते ११.३० दरम्यान हे प्रतिबंध लागू होणार आहेत. तिकीट विक्रीत पारदर्शकता आणण्यास रेल्वेने हा महत्वाकांक्षी उपक्रम चालू केला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!