26 C
New York
Friday, July 4, 2025

Buy now

आम्ही सद्यस्थितीतील जागा सोडणार नाही | भाजी विक्रेता संघटनेचा कणकवली मुख्याधिकारी यांना इशारा

कणकवली : शहरातील उड्डाणपुलाखालील भाजी विक्रेत्यांना नगर पंचायतीने आधी पर्यायी जागा द्यावी. पर्यायी जागा देत नाही, तोवर आम्ही सध्या आहोत त्या हटणार नाही, असा इशारा भाजी विक्रेता संघटनेच्यावतीने मंगळवारी कणकवली मुख्याधिकारी यांना देण्यात आला. अतिक्रमण हटाव कारवाई करायची असेल तर ती सरसकट करा. केवळ भाजी विक्रेत्यांना लक्ष्य करू नका, असेही भाजी विक्रेता संघटनेचे पदाधिकारी, सदस्य म्हणाले.

कणकवली शहरातील बाजारपेठेच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमणांबाबत नगर पंचायत, व्यापारी संघटना आणि पोलीस प्रशासन यांनी सोमवारी सायंकाळी संयुक्त पाहणी केली होती. यात पटवर्धन चौकालगत उड्डाणपुलालगतचे दोन गाळे रिकामे करून तेथे सुशोभिकरण करण्याची मागणी व्यापारी संघटनेने केली होती. त्याअनुषंगाने तेथील भाजी विक्रेता संघटनेने मुख्याधिकारी गौरी पाटील यांची नगरपंचायत येथे भेट घेतली.

या भेटी नंतर भाजी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष अनिल हळदिवे यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी राजू पेंडुरकर दादा पावसकर, अनिल हळदिवे, परेश वाळके, सागर चव्हाण बाळू जैताळकर आदी उपस्थित होते.

श्री. हळदिवे म्हणाले, अतिक्रमण हटाव मोहिमेला आमचा विरोध नाही. पण उड्डाणपुलाखालील आप्पासाहेब पटवर्धन चौकालगतच्या दोन्ही गाळ्यांमध्ये फक्त स्थानिक भाजी विक्रेते बसतात. त्यांना हटवायचे असेल तर आम्हाला पर्यायी जागा दया.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!