16.2 C
New York
Thursday, August 21, 2025

Buy now

उच्च शिक्षणाने स्वतःसोबत समाजाचे नाव उंचवा !

कट्टा येथील गुणगौरव सोहळ्यात उद्योजक रुपेश पावसकर यांचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी – आजचे स्पर्धात्मक युग असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने स्पर्धक बनले पाहिजे. आणि काहीतरी वेगळे करायचे असे प्रत्येक विद्यार्थ्याने ठरवले पाहिजे. आज मुलांना मोबाईल, गाडी याची भुरळ पडत चलली आहे. पण या सर्व गोष्टी तुमच्या शैक्षणिक ज्ञानापुढे फिक्या आहेत. उच्च शिक्षण घेऊन मोठे झालात तर तुमचे नाव समाजात अभिमानाने घेतले जाईल. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवत स्वतःच्या नावासोबत समाजाच्या नावाची उंची वाढवा असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक रुपेश पावसकर यांनी कट्टा येथील भंडारी समाजाच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात बोलताना केले.
मालवण तालुक्यातील ओमगणेश साई मंगल कार्यालय कट्टा माडये हॉल येथे कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ कट्टा यांच्यावतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक रुपेश पावसकर यांच्या हस्ते श्रीगणरायाच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी कट्टा भंडारी समाजाचे अध्यक्ष मामा माडये, सुकळवाड गावराई भंडारी समाज अध्यक्ष बाबुराव मसुरकर, खजिनदार वासुदेव पावसकर, सदस्य मामा बांदिवडेकर, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रदीप आवळेगावकर, देवली सरपंच शाम वाक्कर, आंबेरी सरपंच मनमोहन डीचोलकर, तळगाव सरपंच लता खोत, ॲड. श्वेता तेंडुलकर, वर्षा मिठबावकर, रुद्रा पावसकर, गौरी नार्वेकर, गीता नाईक, त्रिशा हडकर, अक्षता मिठबावकर, प्रांजल नांदोसकर, वैदेही मसुरकर, द्रौपदी सरमळकर, उद्योजक भाऊ नार्वेकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश सरमळकर, शरद केळुसकर , प्रगतशील शेतकरी संदेश नाईक, विवेक जबडे, किशोर वाक्कर, महेश वाईरकर, शरद मांजरेकर, अभय तेंडुलकर, प्रवीण मिठबावकर, ॲड. प्रदीप मिठबावकर, निलेश हडकर, मंगेश माडये, अजय मयेकर, सुरेश कांबळी, सुनील पोखरणकर, विद्याधर चिंदरकर, योगेश पाटकर, जीजी वाईरकर, सुनील शिरोडकर, सिद्धेश वराडकर व अन्य उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थी तसेच विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी यांचा गुणगौरव करण्यात आला.
यावेळी कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ कट्टाचे अध्यक्ष मामा माडये बोलताना म्हणाले की, तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे हे समाजाचे कर्तव्य आहे. ते कर्तव्य आपला समाज पार पाडत आहे. त्यामुळे भविष्यात कितीही मोठे झालात तरी आपल्या समाजाला मात्र विसरू नका. आणि तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर उच्चशिक्षण घेऊन भविष्यात मोठे अधिकारी बनवून समाजाच्या व्यासपीठावर या हे पाहून निश्चितच आम्हाला आनंद होईल.
याचबरोबर ॲड. श्वेता तेंडूलकर, गौरी नार्वेकर, शाम वाक्कर, बाबुराव मसुरकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
याच कार्यक्रमात भंडारी समाजातील नामवंत दशावतारी कलाकार यांचा देखील सत्कार करण्यात आला त्यानंतर भंडारी समाजातील निवडक दशावतारी कलाकारांचे रथी सारथी संग्राम हे महान पौराणिक दशावतारी नाटक सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड प्रदीप मिठबावकर सूत्रसंचालन कीर्ती मयेकर तर आभार अश्विनी पेडणेकर यांनी मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!