22.7 C
New York
Friday, July 11, 2025

Buy now

अॅट्रॉसिटी आणि पोस्को गुन्ह्यातील संशयीतेला अटकपूर्व जामीन मंजूर

कणकवली : तालुक्यातील एका गावातील अनुसूचित जातीच्या अल्पवयीन पीडित युवतीवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीची आई हिला सत्र न्यायाधीश क्रमांक 1 श्री जे. पी. झपाटे यांनी 25 हजार रुपयांच्या जाचमुचलक्याचा सशर्थ अटकपूर्व जामीन मंजूर केला. संशयीतेच्या वतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.

सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून पीडित अल्पवयीन मुलीला विविध ठिकाणी फिरायला नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी कणकवली पोलिसांकडे देण्यात आलेल्या तक्रारीवरून दीप उर्फ गोटया तुकाराम खोचरे याचे विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 64, 64(2),74,75,351(2) बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,68,12 तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 चे कलम 3(1) (डब्ल्यू ),3(1)(आर),3(2) (व्ही आणि व्ही ए) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आरोपी दीप याचेसह त्याची आई हिलादेखील आरोपी करण्यात आले होते. प्रकरणी आरोपी दीप याला पोलिसांनी 10 जून 2025 रोजी अटक केली होती. याच दरम्याने अटकेची भीती असल्याने आरोपीच्या आईच्यावतीने अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला होता. अर्जाच्या सुनावणीत, अर्जदार हिचे बाबतीत गुन्हा केल्याची कोणतीही प्रथम दर्शनी केस नाही, तिला कोठडीत घेऊन तपास करण्याची गरज नाही, त्यामुळे अॅट्रॉसिटी कायद्याखालील अटकपूर्व जामीन न देण्याचे बंधन या कामी लागू होणारे नाही असा युक्तिवाद करण्यात आला तो ग्राह्य धरून अटक केल्यास रु. 25000 च्या जाच मुचलक्यावर तिची मुक्तता करण्यात यावी असे आदेश देतानाच अर्जदार हिने सरकारी पक्षाच्या पुराव्या ढवळाढवळ करू नये, तपासात सहकार्य करावे, आदी अटी घालण्यात आल्या आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!