२१ जून रोजी होणार सन्मान सोहळा संपन्न
कणकवली | मयुर ठाकूर : कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचा सेवापूर्ती गौरव सन्मान सोहळा समिती पंढरपूर यांच्यावतीने सपत्नीक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सन्मान सोहळा शनिवारी २१ जून २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता शामियाना हॉटेल सभागृह स्टेशन रोड पंढरपूर येथे होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एल. एस. सोनकांबळे असणार आहेत. तर मा. सुभाष ढवळे ( माजी मुख्याध्यापक गौतम विद्यालय पंढरपूर ) यांच्या हस्ते होणार आहे. मा. विजयानंद भालशंकर ( विभागिय प्रबंधक ( से.नि.) दी न्यू इंडिया एन्शुरन्स कंपनी ली. ) सोलापूर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्याचप्रमाणे डॉ. प्राचार्य सिकंदर ढवळे ( स्वागताध्यक्ष ), अंबादास वायदंडे ( उपाध्यक्ष ), डी. एन. दोडके ( सचिव ), गिरिष वाघमारे ( से. ने. कार्य. अभियंता मंगळवेढा ) यांची देखील उपस्थिती असणार आहे. तर सदस्य म्हणून जेष्ठ साहित्यिक बा. ना. धांडोरे, गौतम सरतापे, सुनील वाघमारे, श्रीकांत कसबे, राजेंद्र पाराध्ये सर, सुधीर मागाडे सर, आर पी कांबळे, सेवागिरी गोसावी, चंद्रकांत सातपुते सर, इंजी. ज्ञानेश्वर चोरमले, वैभव माने, भारत माळी उपस्थित असणार आहे.