10.5 C
New York
Saturday, March 21, 2026

Buy now

तब्बल ६० लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त

वेंगुर्ले : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यातील मठ चेकपोस्ट वर गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे 20 लाख रुपये किमतीच्या आयशर टेम्पो व 50 लाख 90 हजार रुपये किमतीच्या गोवा बनावटी दारू सहित एकूण 70 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मंगळवारी 17 जून सकाळी 6 वाजता ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग व वेंगुर्ला पोलीस ठाणे यांनी वेंगुर्ले – मठ चेकपोस्ट वर सापळा रचून ही कारवाई केली. यात सुमारे 20 लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो, 50 लाख 90 हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू असा मिळून एकूण 70 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या धर्मेशकुमार पुरुषोत्तम चोबीसा, रा. सुरखंडा, ता. सराडा, जि. विजयपूर, राजस्थान, वय 44 या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राठोड, हेड कॉन्स्टेबल प्रकाश कदम, डोमणिक डिसोजा, बस्त्याव डिसोझा, विल्सन डिसोझा, जॅक्सन घोंसलविस व पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर तसेच वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल राऊळ, पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग खडपकर यांनी ही संयुक्त कारवाई केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!