22.3 C
New York
Sunday, July 6, 2025

Buy now

मोपाकडून लखनऊकडे निघालेल्या इंडिगोच्या विमानाचे तात्काळ लँडिंग

हवेत हेलपाटे खावू लागल्यामुळे वैमानिकाचा निर्णय; दुर्घटना टळल्यामुळे प्रवाशांतून समाधान

बांदा : मोपा येथून लखनऊकडे निघालेल्या इंडिगो कंपनीचे विमान हवेत झेपावल्या नंतर हेलपाटे खावू लागले. त्यामुळे भेदरलेल्या प्रवाशांनी भीतीने आरडाओरड केली. त्यामुळे प्रसंगावधान राखत वैमानिकाने तात्काळ लखनऊच्या अमौसी विमानतळावर हे विमान लँडिंग केले. त्यामुळे दुर्घटना टळली. ही घटना आज दुपारी घडली. हा सर्व प्रकार एका महिला प्रवाशामुळे उघड झाला आहे. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंडिगो कंपनीचे ६ ई ६८११ या विमानाने आज दुपारी लखनऊसाठी उड्डाण घेतले. या विमानातून १७२ प्रवासी प्रवास करत होते. उड्डाण घेतल्यानंतर विमानाचा तोल जाऊन विमान जमिनीच्या दिशेने हेलकावे खाऊ लागले. विमान कोसळणार की काय? या भीतीने विमानातील प्रवाशांनी जीवाच्या आकांताने एकाच आक्रोश केला. मात्र वैमानिकाने प्रसंगवधान दाखवत विमान नियंत्रित केले. तीन तासांच्या सुखरूप प्रवासानंतर विमान लखनऊच्या अमौसी विमानतळावर सायंकाळी सुरक्षितपणे उतरवले. विमान प्रवासातील हा थरारक अनुभव या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवासी जॉली खान यांनी समाज माध्यमांवरून सांगितला आहे. त्यांनी याबाबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत सर्वांच्या आशीर्वादाने आपण सुखरूप असते सांगितले. सध्या पावसाळी वातावरण सुरू असून विमान आकाशात झेपावताना दाट ढगांशी घर्षण झाल्यास विमानातील प्रवाशांना थोडेफार धक्के जाणवतात. यामुळे विमान कोसळते की काय? अशी शंका प्रवाशांमध्ये निर्माण होते. अहमदाबाद येथील विमान अपघाताची घटना ही ताजी असल्याने सध्या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!