0.7 C
New York
Sunday, January 18, 2026

Buy now

कणकवली – आचरा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

वरवडे येथील सेंट उर्सुला स्कूल नजिक रस्त्यावर आले पाणी

कणकवली : मुसळधार पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात धुमाकूळ घातला असून रविवारी रात्री कोसळलेल्या पावसाने कणकवली तालुक्यातील अनेक रस्ते रस्त्यावर पाणी आल्याने बंद झाले होते. रात्रभर पसरलेल्या पावसाने कणकवली आचरा मार्गावरील वरवडे येथील सेंट उर्सुला स्कूल जवळ रस्त्यावर पाणी आल्याने संपूर्ण मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. कणकवली आचरा मार्गाचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने ठिकठिकाणी पाणी साचत आहे. रस्त्यावर पाणी आल्याने जवळपास दहा ते पंधरा गावांचा संपर्क तुटला होता. मात्र पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू होती. कणकवली आचरा रस्त्याच्या बाजूने वाहणाऱ्या गड नदीच्या पाण्याची पातळी वाढली असल्याने किर्लोस बंधारा पाण्याखाली गेला होता. आचरा ते कणकवली रस्त्यावरील वरवडे तालुका कणकवली येथील पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून आता त्याच्या पर्यायी मार्गावर नदीचे पाणी आल्याने आचरा भागाकडून येणारी जाणारी वाहतूक उर्सला शाळा वरवडे येथून कोटकामते ते खुडी, बुधवळे रस्त्यावरून वळविण्यात आली. सार्वजनिक बांधकाम कणकवली यांच्या सूचनेप्रमाणे सदरची वाहतूक वळवण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!