-6.5 C
New York
Monday, December 15, 2025

Buy now

बसस्थानकातील “त्या” धोकादायक झाडाबाबत योग्य तो निर्णय घ्या – राजू कासकर यांची मागणी

छाटणी न झाल्यामुळे अपघाताची शक्यता

सावंतवाडी : येथील बस स्थानकाच्या शौचालयासमोर असलेले भले मोठे उंबराचे झाड धोकादायक झाले आहे. त्यामुळे ते झाड छाटण्यासाठी योग्य ते प्रयत्न करण्यात यावे, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष राजू कासकर यांनी केली आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, बस स्थानक परिसरात उंबराचे झाड गेले अनेक दिवस उभे आहे. त्याची छाटणी न केल्यामुळे फांद्या धोकादायक बनल्या आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवासी व नागरिक ये- जा करत असतात त्यामुळे फांद्या किंवा झाड कोसळुन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी श्री. कासकर यांनी केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!