-1 C
New York
Wednesday, February 4, 2026

Buy now

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील सी.टी. स्कॅन सेवा पूर्ववत

सामाजिक बांधिलकी व युवा रक्तदाता संघटनेच्या प्रयत्नांना यश

सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयातील सी.टी. स्कॅन सेवा पुन्हा सुरू झाली असून याबद्दल सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व रुग्ण कल्याण नियामक समितीचे सदस्य यांनी सरकारचे आभार मानले आहेत. सी.टी. स्कॅन डिपार्टमेंटचे व्यवस्थापक प्रथमेश परब यांनी नुकतीच ही माहिती रवी जाधव यांना दिली. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात ९ हजार पेक्षा अधिक रुग्णांनी सी.टी. स्कॅन तपासणीची विनामूल्य सेवा घेतली होती. या सेवेला एक वर्ष पूर्ण झाल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही सेवा तात्पुरती बंद करण्यात आल्याचे वृत्त आले होते. सरकारकडून संपूर्ण महाराष्ट्रातील सी.टी. स्कॅन विभागांची बिले थकबाकीत असल्याने ही सेवा थांबवण्यात आली होती. ही सेवा पुन्हा सुरू व्हावी यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान आणि युवा रक्तदाता संघटना यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले होते. या प्रयत्नांना यश मिळाले असून सरकारने योग्य तोडगा काढून ही सेवा पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. आजपासून ही सेवा रुग्णांसाठी पुन्हा विनामूल्य सुरू झाली. याबद्दल सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे, महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग, क्रस्ना डायग्नोस्टिक लिमिटेड, जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर श्रीपाद पाटील, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर ऐवळे आणि सी.टी. स्कॅन तपासणीची २४ तास सेवा देणारा कर्मचारी वर्ग यांचे रवी जाधव आणि लक्ष्मण कदम यांनी आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!