-6.5 C
New York
Monday, December 15, 2025

Buy now

एलआयसी कडून पोईप हायस्कूलला स्कूल बस प्रदान…!

मालवण : लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून गोल्डन ज्यूबिली फाउंडेशन अंतर्गत अंतर्गत मालवण तालुक्यातील पोईप हायस्कूल ला विद्यार्थी वाहतुकीसाठी स्कूल बस प्रदान करण्यात आली

यावेळी झालेल्या कार्यक्रमात एलआयसीचे डी.एम श्री पराते, डेप्युटी मॅनेजर सुरेंद्र मोरे, एलआयसी ए.बी.एम किरण पालव, एलआयसी डी.ओ श्री पावसकर, संस्थाध्यक्ष अनिल कांदळकर, संस्था संचालक सत्यवान पालव, प्रशाला मुख्याध्यापक विकास कुंभार, सहाय्यक शिक्षक दत्तात्रय कारंडे, कर्मचारी नंदकिशोर तावडे, विठोबा माधव, अभिजीत धुरी, व विद्यार्थी, पालक उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्याध्यापक विकास कुंभार म्हणाले की पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटी संचलित इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल मध्ये परिसरातील गावातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात अंदाजे आठ ते दहा किलोमीटर परिसरातील विद्यार्थी यांना प्रशालेत येण्यासाठी वेळेवर एसटीची सोय नसल्याने एलआयसी कडून दिलेल्या या बसच्या भविष्यात मोठा उपयोग होणार आहे. वेरली, राठिवडे, हिवाळे, चुनवरे, मालोंड, बागायत या परिसरातील विद्यार्थ्यांना प्रामुख्याने या स्कूलबसचा ल याबाबत पोईप एज्युकेशन सोसायटीच्या वतीने लाइफ इन्शुरन्स कंपनीला व अधिकाऱ्यांना धन्यवाद देऊन आभार मानण्यात आले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!